S M L

पाण्याच्या थेंबाथेबासाठी खोल विहिरीत उतरून केली जाणारी जीवघेणी कसरत रोजचीच!

खळाळत्या पाण्याच्या सरकारी जाहिरातलं थोडं पाणी या वाड्या वस्त्यांवर, तांड्यावर पोहोचलं तर यांनाही वाटेल 'व्हय हे माझं सरकार हाय'.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 10, 2018 09:48 AM IST

पाण्याच्या थेंबाथेबासाठी खोल विहिरीत उतरून केली जाणारी जीवघेणी कसरत रोजचीच!

मुजिब शेख, 10 एप्रिल : दुष्काळी तालुका म्हणून ओळ्ख असलेल्या नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झालीये. गाव, वाडी आणि तांडयामध्ये दुष्काळामुळे अनेकांनी स्थलांतर केलंय. गावात राहिलेल्यांची पाण्यासाठी खोल विहिरीत उतरुन जिवघेणी कसरत करावी लागत आहे.

पाण्याच्या थेंबाथेबासाठी खोल विहिरीत उतरून केली जाणारी जीवघेणी कसरत रोजचीच आहे. आबादी तांड्यावरचा बोअर आटल्यामुळे चार किलोमीटर असलेल्या सरकारी विहिरीवर रोज महिलांचा मोर्चा रोज धडकतो. तिथं दीडशे फुट खोल विहिरीत तळ गाठलेल्या पाण्याला वर आणावं लागतं तेव्हा कुठे तहान भागते. पाईपलाईनच्या लिकेजमधून येणाऱ्या घाण पाण्यासाठीही दिवसभर रांग लावावी लागते. तेच दुषित पाणी प्यावं लागतं.

14 वर्षांची विद्या जिल्हा परीषदेच्या शाळेत नववीत शिकते. पण पाण्यासाठी तिला शाळा सोडावी लागली. तिच्यासारख्या अनेकींच्या स्वप्नावर पाणी फिरलंय.

Loading...
Loading...

दुष्काळामुळे शेती पोट भरू शकत नाही म्हणून पोटासाठी अनेकांनी मुबई- पुणे गाठलं. गावात राहिलेल्यांना पाणी द्यायची सरकार घेत नाही.

खळाळत्या पाण्याच्या सरकारी जाहिरातलं थोडं पाणी या वाड्या वस्त्यांवर, तांड्यावर पोहोचलं तर यांनाही वाटेल 'व्हय हे माझं सरकार हाय'.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 09:48 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close