विषबाधा झालेल्या शेतकऱ्याला 10 लाखाची मदत करा- बच्चू कडू

विषबाधा झालेल्या शेतकऱ्याला 10 लाखाची मदत करा- बच्चू कडू

सरकारने 15 दिवसात पीडित शेतकऱ्यांसंदर्भात मदतीचं पाऊल उचललं नाही तर कृषी सचिव किंवा आणि कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावर फवारणी करू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.

  • Share this:

03 आॅक्टोबर : पिकावरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी नवनवीन कीटकनाशकांचा उपयोग करतात.  मात्र ही कीटकनाशकं आता अळ्यांपेक्षा फवारणी करणाऱ्यासाठी जीवघेणी ठरतायत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जुलैपासून 18 शेतमजुरांचा फवारणीनंतर मृत्यू झाला आहे. कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ 10 लाख रुपयांची मदत करावी,अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केलीय.

यामुळे आता कीटकनाशक कंपन्यांची चौकशी होणार, वापरलेली कीटकाकनाशकांचे नमुने घेतले गेल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. दुसरीकडे, मुंबई रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत ज्या पद्धतीनं तातडीनं मदत केली त्याच धर्तीवर सरकारने 15 दिवसात पीडित शेतकऱ्यांसंदर्भात मदतीचं पाऊल उचललं नाही तर कृषी सचिव किंवा आणि कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावर फवारणी करू असा इशाराही  बच्चू कडू यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 02:00 PM IST

ताज्या बातम्या