सोलापुरात जन्मले दोन तोंडं मात्र शरीर एक असलेले बाळ!

स्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेऊ शकते.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2018 01:26 PM IST

सोलापुरात जन्मले दोन तोंडं मात्र शरीर एक असलेले बाळ!

14 एप्रिल : सोलापुरात एका विशिष्ट शरीररचना असलेल्या बाळाचा जन्म झालाय. दोन तोंडं आणि शरीर मात्र एकच अशा अवस्थेत असलेल्या बालिकेचा जन्म सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) झालाय. लाखात एखादी घडणारी ही गोष्ट डॉक्‍टरांसाठी आव्हान देणारी आहे. अशा बाळाला सयामी जुळे असेही म्हटले जाते.

सोलापूरच्या सिव्हिलमध्ये अशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्मल्याचा दावा डॉक्‍टरांनी केलाय. स्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेऊ शकते.

प्रसूतीपूर्वी करण्यात आलेल्या सोनोग्राफीत पोटात दोन तोंडं असलेलं बाळ असल्याची कल्पना डॉक्‍टरांनी आईला आणि त्यांच्या कुटुंबाला दिली होती. त्यामुळे त्यांची मानसिक तयार झाली होती. बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम इतके आहे.

दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे. त्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधान आलय. दरम्यान या बाळाच्या कुटुंबीयांची ओळख सिव्हिल प्रशासनाने गुप्त ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...