बीडमध्ये जन्मले दोन तोंडाचे बाळ !

बीडमध्ये जन्मले दोन तोंडाचे बाळ !

बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत आणि बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

30 आॅक्टोबर : अंबाजोगाई इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विभागाच्या प्रसुती विभागात  दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झालाय.  प्रसुतीशास्त्र विभागातील सर्जन डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रीया पार पडली. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत आणि बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अंबेजोगाई इथल्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तिच्यावर उपचार करतांना तिच्या पोटातील बाळ अॅबनॉर्मल आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेचं सीझर केलं आणि बाळाला बाहेर काढलं तेव्हा बाळाला दोन तोंड असल्याचं लक्षात आलं.

या बाळाचं वजन ३ किलो ७०० ग्रॅम आहे. या बाळाला दोन डोके, दोन किडनी आहेत. पण इतर सर्व अवयव एक एकच आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी २०१४ साली एका महिलेने सातव्या महिन्यात अशाच एका बाळाला जन्म दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 08:56 PM IST

ताज्या बातम्या