'ज्याला कुणी पोरगी देत नाही, तो मोदींवर टीका करतोय', लोणीकर राहुल गांधींवर घसरले

एवढंच नाहीतर एवढंच नाहीतर ज्याला कुणी पोरगी देत नाही, त्यांचं लग्न होत नाही तो मोदींवर टीका करतोय अशा एकेरी उल्लेखही लोणीकरांनी केला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2017 06:37 PM IST

'ज्याला कुणी पोरगी देत नाही, तो मोदींवर टीका करतोय', लोणीकर राहुल गांधींवर घसरले

12 सप्टेंबर : राहुल गांधी यांनी परभणीत मोदींवर केली त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची सभा उधळून पुतळे जाळायला पाहिजे होते भाजप इट का जवाब पत्तर से देता असं त्यांना दाखवायला पाहिजे होतं असं खळबळजनक विधान राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांनी केलंय. एवढंच नाहीतर एवढंच नाहीतर ज्याला कुणी पोरगी देत नाही, त्यांचं लग्न होत नाही तो मोदींवर टीका करतोय अशा एकेरी उल्लेखही लोणीकरांनी केला.

सध्या भाजपमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच लागली अनेक नेते वेगवेगळी विधान करताहेत त्यातच भर टाकलीय पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी...परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बबनराव लोणीकर  यांनी राहुल गांधींच्या नावाने चांगलीच आगपाखड केली.

राहुल गांधी यांचा मराठवाड्यात दौरा झाला त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती. बबनराव लोणीकर यांनी राहुल गांधी यांची मिमीक्री करीत त्यांच्या व्यक्तीगत जीवनावर टीका केली. ज्याला कुणी पोरगी देत नाही,ज्याच लग्न होत नाही ते मोदी मोदी का करतो, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे पुतळे जाळायले पाहिजे होते. आपल्या परतीच्या नेत्यावर जर कुणी टीका करीत असेल तर इट का जवाब पत्थर से द्या असं आव्हानच लोणीकरांनी कार्यकर्त्यांना केले.

तसंच टीका करणार्‍यांचे सभा उधळा, पुतळे जाळा आणि त्यांचा निषेध करून बातम्या छापून आणा असे धडे लोणीकरांनी यावेळी भाजपांच्या कार्यकर्त्यांना दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 06:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...