शेतकऱ्यांच्या संपात गेल्या 6 दिवसांत 278 कोटींचं नुकसान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 12:16 PM IST

शेतकऱ्यांच्या संपात गेल्या 6 दिवसांत 278 कोटींचं नुकसान

रफीक मुल्ला, मुंबई; 07 जून : शेतकऱ्यांच्या संपामुळे गेल्या 6 दिवसात सरासरी 278 कोटींचं नुकसान झालं आहे. सरकारतर्फे नुकसानीचा नेमका आढावा अद्याप घेतला गेलेला नाही, मात्र मार्केट यार्ड आणि खूल्या बाजारात मिळून सरासरी एवढं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात 100 कोटीपेक्षा जास्त म्हणजे सर्वाधिक नुकसान झालं आहे.

राज्यातल्या शेतकरी संपाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांनाच बसलाय, भाजीपाला-फळं आदी शेतमाल बाजार समितीपर्यत न पोहचल्याने आणि हा माल घरात किंवा गोडाऊनमध्ये पडून राहिल्याने सुमारे 278 कोटींचं नुकसान झालं आहे. अर्थात यामध्ये रस्त्यावर केलेल्या नासधूसीच्या नुकसानीचाही समावेश आहे.

सरकार काहीही दावा करत कसलं तरी, राज्यातल्या 307 बाजार समित्यांपैकी काही अपवाद वगळता जवळपास सर्व समित्यांमध्ये शेतमाल नेहमीप्रमाणे पोहोचला नाही, यातून नुकसानीची सरासरी समोर आलीय. गेल्या 6 दिवसात

संपामुळे 278 कोटींचं नुकसान

    Loading...

  • नाशिकमध्ये दररोज सुमारे 20 कोटींची उलाढाल
  • सरासरी सर्वाधिक 100 ते 120 कोटींचं नुकसान
  • कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यात 80 ते 90 कोटींचं नुकसान
  • इतर समित्यांचं मिळून सरासरी 80 कोटींचं नुकसान

नाशिक-पुणे आणि अहमदनगर इथून मुख्यत: मुंबईला शेतमालाचा पुरवठा होतो. नाशिकमधून सर्वाधिक 40 टक्के पुरवठा केला जातो. मात्र संपकाळात तो अत्यंत कमी झाल्याने परराज्यातून माल आला. ग्राहकांना तो 30 ते 40 टक्के चढ्या भावानं खरेदी करावा लागला- हे ही ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसानंच झालंय.

राज्यातल्या बाजार समित्यांची वार्षिक उलाढाल 60 ते 65 हजार कोटी आहे. या आकड्यांवरुन संपकाळातल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो. हाच संप नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात झाला असता तर तिप्पट नुकसान झालं असतं. नुकसानीचे हे आकडे पाहून संप मिटवण्याचा दबाव शेतकरी आणि सरकारवरही आहे, हे नक्की.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...