प्रामाणिकपणा आहे कुठे ?, इथं आहे !, रिक्षाचालकाने 10 तोळं सोनं केलं परत

वसिम शेख या सर्वसाधारण कुटुंबातील रिक्षा चालकाने तब्बल १० तोळं सोनं असलेली बॅग ऑटो रिक्षात विसरलेल्या महिला प्रवाशाला परत केलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 20, 2017 12:00 AM IST

प्रामाणिकपणा आहे कुठे ?, इथं आहे !, रिक्षाचालकाने 10 तोळं सोनं केलं परत

अनिस शेख, मावळ

19 मे : जगातून प्रामाणिकपणाचा अंत झाल्याचं कितीही म्हटलं जात असलं तरी तो असल्याची प्रचिती आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येत असते. अशीच एक घटना मावळ मधल्या देहुरोड इथं घडलीय. वसिम शेख या सर्वसाधारण कुटुंबातील रिक्षा चालकाने तब्बल १० तोळं सोनं असलेली बॅग ऑटो रिक्षात विसरलेल्या महिला प्रवाशाला परत केलीय.

या लोकांकडून पाठ थोपटून घेणारा हा आहे रिक्षाचालक वसीम शेख... वसीमने कामंही केलंय कौतुक करण्यासारखं.. कारण त्याच्या रिक्षात बसलेल्या प्रवासी महिलेचे 10 तोळं सोनं परत करण्याचा प्रामाणिकपणा वसीमने दाखवलाय. वसीम देहूरोड रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतोय. गुरुवारी वसीमच्या रिक्षात एक महिला प्रवासी बसली. या महिलेकडे एक बॅग होती आणि गडबडीत ती बॅग वसीमच्या रिक्षात विसरली.

वसीमने या महिलेला देहुरोड रेल्वेस्थानकाबाहेर सोडलं आणि निघून गेला. मात्र, काही वेळातच वसीमच्या लक्षात आलं की, प्रवासी महिलेची बॅग आपल्या रिक्षात विसरलीय आणि मग वसीमने सुरू केली प्रवासी महिलेला शोधण्याची शोध मोहीम...बऱ्याच वेळानंतर आपली बॅग शोधत फिरणारी त्या महिला प्रवासी वसीमला भेटल्या ते वृंदावन चौकात...बॅगेतले दागिने सुखरूप आहे हे कळताच प्रवासी महिलेला भडभडून आलं. आणि वसीमचं कौतुक सुरू झालं.

एकीकडे प्रामाणिकपणा आहे कुठं असं आपण सहज बोलून जातो.. मात्र वसीम शेख सारख्या प्रामाणिक माणलासा भेटलं की, हे समज मनातून निघून जातात. खरंच वसीम तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाचा आम्हाला अभिमान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 06:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...