पालघर जिल्ह्यात आज आरटीओसाठी रिक्षाचालकांचा बंद

पालघर जिल्ह्यात आज आरटीओसाठी रिक्षाचालकांचा बंद

. आरटीओ पासिंग आता कल्याण इथं स्थलांतरीत केलं गेलं आहे. तर पालघर जिल्हा स्थापन होऊन 3 वर्ष झाले आहेत. तरीही जिल्ह्यात आरटीओ कार्यालय स्थापन झालं नाही म्हणून हा बंद पुकरण्यात आलाय.

  • Share this:

 पालघर,10 सप्टेंबर: पालघर जिल्ह्यातील सर्व तीन आणि सहा आसनी रिक्षा चालकांनी बंद पुकारलाय. या बंदला सकाळपासून सुरूवात झालीय.

हा बंद फक्त आरटीओच्या मुद्द्यावरून करण्यात आलाय. आरटीओ पासिंग आता कल्याण इथं स्थलांतरीत केलं गेलं आहे. तर पालघर जिल्हा स्थापन होऊन 3 वर्ष झाले आहेत. तरीही जिल्ह्यात आरटीओ कार्यालय स्थापन झालं नाही म्हणून हा बंद पुकरण्यात आलाय.

रिक्षाचालकांना पासिंगसाठी मध्यरात्रीच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठी गैरसोय होते. अशी तक्रार ऑटोचालकांनी केलीय. या बंदमुळे कामावर निघालेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. या बंदमध्ये मालवाहू वाहनचालक सहभागी झाल्याने बाजारपेठ आणि इतर व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदमुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून एसटी बस ना गर्दी होते आहे.

या बंदमध्ये मालवाहू वाहनचालक सहभागी झाल्याने बाजारपेठ आणि इतर व्यवहार ठप्प होणार आहे. उच्च न्यायालयाने बेस्ट टेस्ट ट्रॅक वरच योग्यता चाचणी घेण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिल्याने या पासिंगसाठी पालघरहून कल्याण येथे जावं लागणार आहे. पासिंगसाठी आवश्यक बेस्ट टेस्ट ट्रॅक पालघर येथे उभारण्यात यावा ही देखील बंद पुकारलेल्या संस्थानाची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 11:49 AM IST

ताज्या बातम्या