News18 Lokmat

औरंगाबादेत पेटला 'कचरा' वाद; सात दिवसात अडीच हजार टन कचऱ्याचे डोंगर, प्रशासन मात्र ढिम्म!

शहरात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कचरा डेपो फुल झाले आहेत. कचराकुंड्याही भरून गेल्यात. शहरात तब्बल अडीच हजार टन कचरा साचला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2018 09:05 AM IST

औरंगाबादेत पेटला 'कचरा' वाद; सात दिवसात अडीच हजार टन कचऱ्याचे डोंगर, प्रशासन मात्र ढिम्म!

22 फेब्रुवारी : औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न सातव्या दिवशी सुटलेला नाही. त्यामुळे शहरात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कचरा डेपो फुल झाले आहेत. कचराकुंड्याही भरून गेल्यात. शहरात तब्बल अडीच हजार टन कचरा साचला आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो. पण औरंगाबादचे नागरिक या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रोज जगतायत. या सगळ्या गंभीर अवस्थेनंतर आता या घाणीच्या साम्राज्याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार आहे.

वेळ पडली तर जिल्हा प्रशासन पोलीस बळाचा वापर करून नारेगावात आज कचरा टाकण्याची शक्यता आहे. मात्र नागरीक आपल्या मतावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थिती मध्ये कचरा टाकू देणार नाही अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज पहाटेच नागरीक आणि पोलिसांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत घाणीचं साम्राज्य

- शहरातील कचरा डेपोवर पाच दिवसांचा कचरा पडून आहे. त्यामुळं शहरात दुर्गंधी पसरली आहे.

Loading...

- सहाव्या दिवशी शहरात कचरा कोंडी कायम

- दोन हजार मेट्रीक टन कचरा पडून

- रमानगर स्मशानभूमी, जकात नाका, मुख्य बसस्टॅड, कचरा डेपो फुल

- महापौरांची शहरात हाय अलर्टची घोषणा

- झोपडपट्टी भागात दोन लाख मास्क वाटणार

- मनपाचे आरोग्य सायंकाळी सुरू, डॅाक्टरांच्या सुट्टया रद्द

- पाच टन जंतनाशक पावडर खरेदी करणार

कचरा प्रकरण का चिघळले ?

- औरंगाबाद महापालिका निष्काळजी पणा

- गावकऱ्यांनी दिलेल्या इशाराकडे दुर्लक्ष

- 2003 साली हायकोर्टने कचरा डेपो हलविण्यास सांगून सुद्धा कारवाई नाही.

- दुसरा पर्याय शोधण्यास महापालिकेला आलेले अपयश

- बाभूळगावच्या नागरिकांनीसुद्धा कचरा टाकण्यास विरोध केल्याने पर्याय नाही.

- त्यामुळे कचरा टाकावा कुठे हा प्रश्न

- शहरात साचला 3 हजार मेट्रिक टन कचरा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2018 09:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...