'वर्दी'वर हात उचलणाऱ्या तरुणाला पोलिसांनी भररस्त्यावर झोडपलं

या तरुणाने उलट शिरजोरी करत पोलिसालाच शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 24, 2017 05:37 PM IST

'वर्दी'वर हात उचलणाऱ्या तरुणाला पोलिसांनी भररस्त्यावर झोडपलं

24 मे : विनाहेल्मेट गाडी दामटणाऱ्या तरुणाला  अडवलं म्हणून पोलिसांनाच मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी भररस्त्यावर चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी  या तरुणाला 'खाकीचा प्रसाद' देत ताब्यात घेतलं.

औरंगाबादमधील आकाशवाणी चौकात तरुणाने हेल्मेट घातलं नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी त्या तरूणाला पकडलं. मात्र या तरूणाने उलट शिरजोरी करत पोलिसालाच शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनीही त्याला भररस्त्यात अद्दल घडवण्यासाठी त्याला मारहाण केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. एकीकडे वाहतुकीचे नियम मोडून पोलिसाला मारहाण करायची हा प्रकार कितपत योग्य आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2017 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...