News18 Lokmat

'सॉरी भावा, बाय बरं का...',सचिन वाघचा मन हेलावून टाकणारा अखेरचा फोन !

सचिनने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन लावला होता. त्याचा अखेर संवाद हा मन हेलावून टाकणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2018 09:04 PM IST

'सॉरी भावा, बाय बरं का...',सचिन वाघचा मन हेलावून टाकणारा अखेरचा फोन !

औरंगाबाद, 11 एप्रिल :  आपण नापास झालो तर सहा महिने पुन्हा बॅक बसेल या भीतीने एमआयटी काॅलेजमधील सचिन वाघ या विद्यार्थ्यांने काॅलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. सचिनने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन लावला होता. त्याचा अखेर संवाद हा मन हेलावून टाकणार आहे.

औरंगाबादमधील सुप्रसिद्ध एमआयटी काॅलेजमध्ये सचिन वाघने आत्यमत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली.  सचिन हा नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत होता.

परिक्षेदरम्यान काॅपी पकडल्यामुळे  सचिन वाघने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सचिनच्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सचिनच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज पोलीस स्टेशनवर मोर्चाही काढला.

दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी सचिन वाघ यानं त्याच्या मित्राला अखेरचा फोन केला होता. ते संभाषण ऐकल्यानंतर सचिन पूर्णपणे नैराश्याच्या गर्तेत गेला होता. सचिननं त्याच्या मित्राशी फोनवरून मला सहा महिन्याचा बॅक बसणार आहे, माझी चिट पकडलीये, आता मी चौथ्या मजल्यावरून उडी मारतोय, माझ्या घरच्यांना सांग...साॅरी भावा आता बाय...असं म्हणून त्याने फोन ठेवला.

Loading...

सचिन वाघचा अखेरचा फोन...

मित्र - हॅलो

सचिन वाघ - हा भाऊ कुठे आहेस?

मित्र - घरी आहे, बोल ना...

सचिन वाघ - अरे भावा ऐक ना... कॉलेजमध्ये माझा पेपर चालू होता

मित्र - हा...

सचिन वाघ - हॅलो

मित्र - हा बोल ना, बोल ना

सचिन वाघ - माझी आज चिट पकडली

मित्र - चिट पकडली का?

सचिन वाघ - मला सहा महिने बॅक राहायला लावताहेत

मित्र - लॉस... आता विषय आहे काही? थांब, फोन लावतो भाऊला

सचिन वाघ - ऐक ऐक, मी आता चौथ्या फ्लोअरहून उडी मारतोय

मित्र - काय...काय...?

सचिन वाघ - माझ्या घरच्यांना सांग

मित्र - ए...XXX...थांब.. ए असं काही नको करू, बरं का सचिन

सचिन वाघ - सॉरी भावा, बाय बरं का

मित्र - ए सचिन असं नको करू...भावा भावा ऐक ऐक...हॅलो...हॅलो...

सचिन वाघ - भाऊ सॉरी यार

मित्र - असं काही करू नको बरं का...दोन मिनिटं थांब...अरं मी करतो सगळं...तुला बॅक नाही राहू देत, थांब

सचिन वाघ - माझ्या घरच्यांना सांग...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2018 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...