मेडिकल विद्यार्थिनीच्या हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा

मासिक पाळी असल्याने आरोपी पीडितेवर बलात्कार करू शकला नाही. त्यानंतर त्याने आकांक्षा गळा आवळून खून केला.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 10:51 AM IST

मेडिकल विद्यार्थिनीच्या हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 18 डिसेंबर : एमजीएमच्या गंगा वसतिगृहातील आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. याप्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मासिक पाळी असल्याने आरोपी पीडितेवर बलात्कार करू शकला नाही. त्यानंतर त्याने आकांक्षा गळा आवळून खून केला.

पोलिसांनी या हत्याप्रकरणात राहुल शर्मा या आरोपीला अटक केली आहे. राहुल शर्मा हा मूळचा बाहेरच्या राज्यातील असून तो इथं मजुरीचं काम करत होता. आकांक्षा देशमुख या मेडिकलच्या विद्यार्थिनीचा 10 डिसेंबरला वसतिगृहातच खून करण्यात आला होता.

राहुल शर्मा हा आरोपी रात्री 9.30 वाजताच वसतिगृहाच्या छतावर जाऊन लपला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास राहुल हा आकांशाच्या खोलीत चोरीच्या उद्देशाने शिरला. यावेळी त्याची आकांक्षासोबत झटापट झाली. तिची सोनसोखळी चोरत त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पण आकांक्षाला मासिक पाळी सुरू असल्याने तो तिच्यावर बलात्कार करू शकला नाही. त्यामुळे राहुलने तिचा गळा दाबून खून केला.

आकांक्षाचा खून केल्यानंतर आरोपी राहुलने लगेच आपलं गाव गाठलं. चार मजुरांना सोबत घेत उत्तर प्रदेशात गावाकडे आईला भेटण्यासाठी जात असल्याचं त्याच्या सोबत राहणाऱ्या इतर लोकांना सांगितलं. राहुल शर्मा अचानक गावी गेल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. त्यातूनच पोलिसांना त्याचा तपास सुरू केला होता.

आरोपीकडून ओळख लपवण्याचा प्रयत्न

Loading...

औरंगाबादमधून बाहेर पडल्यानंतर गावी गेल्यानंतर राहुलने दाढी आणि डोक्याचे केस कापत रुप बदलले. या दरम्यान पोलिसांनी सर्व मजुरांची यादी करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी परराज्यात जाऊन शर्माला ताब्यात घेतलं.

गुन्ह्याची दिली कबुली

घटनेच्या आधी सात दिवसांपासून शर्मा आकांक्षाच्या खोलीसमोरच काम करत असे. यामुळे त्याला तिच्याबद्दल माहिती होती. यावरूनच चोरी आणि बलात्काराच्या उद्देशाने आकाक्षांचा खून केल्याची कबुली राहुल शर्माने पोलिसांना दिली आहे.

काय आहे प्रकरण?

10 डिसेंबर रोजी आकांक्षा देशमुखची हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात आकांक्षाचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून पोलिसांनी आकांक्षाच्या मारेकऱ्यांचा कसून तपास सुरू केला होता.


VIDEO : राहुल गांधी यांच्या या एका मास्टरप्लॅनने मोदींवर केली मात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...