जायकवाडी धरण 95 टक्के भरलं, 18 दरवाजे उघडले

जायकवाडी धरण 95 टक्के भरलं, 18 दरवाजे उघडले

गुरुवारी रात्री 11 वाजता धरणारे 18 दरवाजे उघडण्यात आले आहे.

  • Share this:

21 सप्टेंबर : दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरण भरलंय. गुरुवारी रात्री 11 वाजता धरणारे 18 दरवाजे उघडण्यात आले आहे.

जायकवाडी धरणाचा गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच पाणीपातळी 95 टक्के झाली आहे. अजूनही पाण्याची आवक सुरू आहे.

धरणाची पाणी पातळी लक्षात घेता गुरुवारी रात्री  ११  वाजता धरणाचे आठरा वक्र दरवाजे  अर्धा  फूट वर उचलण्यात आले असून धरणातून 10 हजार क्युसेक पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.

त्यामुळे गोदावरी नदीपात्रात जवळील गावांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नदीपात्रात कोणीही जावू नये, जनावरं, वाहनं पात्रात घेवून जावू नयेत याबाबत सर्वांना सुचना करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 11:39 PM IST

ताज्या बातम्या