गुलाबजामच्या पाकात पडून दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबजामच्या पाकात पडून दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबादेतील दलालवाडी परिसरात धार्मिक कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या गुलाबजामच्या पाकात पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

  • Share this:

औरंगाबाद, 26 नोव्हेंबर - औरंगाबादेतील दलालवाडी परिसरात एक दुर्देवी घटना घडली आहे. धार्मिक कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या गुलाबजामच्या पाकात पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. राजवीर नितीन मेघावाले असं त्या चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दलालवाडीत मेघावाले यांच्याकडे येत्या गुरुवारी एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त महाप्रसाद देखील आयोजित करण्यात आला होता. त्याची पूर्व तयारी म्हणून महाप्रसादाची तयारी करण्यात येत होती. घरासमोरच गुलाबजाम आणि त्याचा पाक तयार करण्यात येत होते.

यादरम्यान, मेघावाले यांचा दोन वर्षांचा राजवीर खेळता खेळता तिथे पोहोचला. घरातील सर्व जण कार्यक्रमात व्यस्त होते आणि याच दरम्यान राजवीर गुलाबजामसाठी तयार केलेल्या गरम पाकाच्या कढईत पडला. यात तो गंभीररित्या भाजला गेला.

कुटुंबीयांनी राजवीरला ताबडतोब घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. अखेर मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज संपली. सोमवारी पहाटे राजवीरचा मृत्यू झाला. या प्रकरणी क्रांती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


#Mumbai26/11 : कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या देविकाला भेटायचंय मोदींना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 06:16 PM IST

ताज्या बातम्या