S M L

औरंगाबादचं 'घाटी' रुग्णालय, चिमुरडीला वडिलांसाठी व्हावं लागलं 'सलाईन स्टँड'

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात या चिमुकलीचा असा स्टँड म्हणून वापर केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय

Sachin Salve | Updated On: May 9, 2018 07:35 PM IST

औरंगाबादचं 'घाटी' रुग्णालय, चिमुरडीला वडिलांसाठी व्हावं लागलं 'सलाईन स्टँड'

औरंगाबाद, 09 मे : शासकीय रूग्णालयात बहुतांशवेळा आपला अनुभव चांगला नसतो. काही शासकीय रूग्णालयांमध्ये कर्मचारी रूग्णांच्या नातेवईकांनाच कामाला लावतात. जणू रुग्णालयातील उपचार हे शिक्षाच ठरावी. औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात एका चिमुरडीसोबत असा प्रसंग घडलाय..जो पाहिला तर तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि तुम्हाला संतापही येईल.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात या चिमुकलीचा असा स्टँड म्हणून वापर केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. घाटी रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक 17 मध्ये शस्त्रक्रियेनंतर एकनाथ गवळी यांना सलाईन लावण्यात आलं. त्यावेळी धृपदा ही सहा वर्षांची मुलगी त्यांच्याजवळ होती. तिच्या हातात सलाईन सोपलं गेलं. ती जवळपास अर्धा ते पाऊण तास अशीच टाचा उंच करून ताटकळत उभी होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणं ही जणू शिक्षा ठरू लागलीय.

घाटी रूग्णालयात हा प्रकार पहिल्यांदाच घडला असं नाही. रूग्णालयात आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना कधी स्ट्रेचर स्वत:च ढकलावं लागतं तर कधी कधी रूग्णाला नातेवाईकांवर स्वत:च उचलून नेण्याची वेळ येते. असे प्रकार अनेकदा आणि राजरोस पणे घडतात. मात्र घाटी प्रशासन याबद्दल बोलायला तयार होतच नाही. अश्या घटनांमुळेच घाटी रूग्णालयात डॅाक्टर आणि नातेवाईकांमध्ये अनेकवेळा संघर्ष उडाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2018 07:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close