कचरा कोंडी भोवली, औरंगाबाद आणि केडीएमसी पालिका आयुक्तांची बदली

कचरा कोंडी भोवली, औरंगाबाद आणि केडीएमसी पालिका आयुक्तांची बदली

  • Share this:

16 मार्च : कचरा कोंडी प्रकरणी औरंगाबाद पालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आलीये. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये कचरा कोंडी दरम्यान पोलिसांनी दगडफेक केली होती. या प्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. आज कचरा कोंडी प्रकरणी  मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आलीये.

औरंगाबाद प्रमाणे कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा कोंडी झालीये. याचाच ठपका ठेवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारसू यांचीही बदली करण्यात आली.

पी वेलारसू यांना एमएसआरडीसीवर पाठवण्यात आलं तर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी गोविंद बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 05:13 PM IST

ताज्या बातम्या