S M L

औरंगाबादमधले नाले अजूनही उघडेच, पाण्याच्या लोंढ्यात बुलेटही गेली वाहून, चालकाचा मृत्यू

चेतन चोपडे या तरुणाचा त्याच्या बाईकसह नाल्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 22, 2018 10:21 AM IST

औरंगाबादमधले नाले अजूनही उघडेच, पाण्याच्या लोंढ्यात बुलेटही गेली वाहून, चालकाचा मृत्यू

औरंगाबाद, 22 जून : औरंगाबादमध्ये उघड्या नाल्यामुळे दुसरा बळी गेला आहे. नाल्यात वाहून गेल्यानं औरंगाबादमध्ये 3 दिवसांत दुसरा मृत्यू झाला आहे. चेतन चोपडे या तरुणाचा त्याच्या बाईकसह नाल्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला आहे.

काल झालेल्या पावसामुळे नाला भरून वाहत होता, आणि म्हणून चेतनला त्याचा अंदाज आला नाही. आणि तो त्या नाल्यात पडला. त्यात पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्याची बुलेटही पाण्यात वाहून गेली आणि यात चेतनचा मृत्यू झाला आहे.

गंभीर म्हणजे एवढ्या मोठ्या नाल्यांना संरक्षण भिंती नाहीत की कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स नाहीत. खरंतर हा पालिकेनं नागरिकांशी केलेला खेळच आहे.

काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांचा खात्मा करणार 'NSG'ची बलाढ्य फौज

VIDEO RPFची दादागिरी शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की

पावसाळ्याआधी नाले बंद करणं, रस्त्यांवरचे खड्डे बुजवणे ही पालिकेची जबाबदारी असते. पण औरंगाबाद महापालिकेचा हलगर्जीपणा आता नागरिकांचे जीव घ्यायला लागला असंच म्हणायला हवं. पण आता या प्रकारांमुळे तरी महापालिका जागी होणार का हेच बघणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा...

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

आफ्रिकेत एड्स कार्यकर्त्यांनी औषधांबदल्यात ठेवले शरीर संबंध, वेश्यांचा केला वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close