सावधान, तुमच्याही थाळीत कुत्ता बिर्याणी वाढलेली असू शकते !

सावधान, तुमच्याही थाळीत कुत्ता बिर्याणी वाढलेली असू शकते !

औरंगाबादेत स्वस्त बिर्याणीच्या नावाखाली ग्राहकांना चक्क कुत्ता बिर्याणी खाऊ घातली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनीच हा धक्कादायक आरोप केलाय.

  • Share this:

औरंगाबाद. 26 सप्टेंबर : औरंगाबादेत स्वस्त बिर्याणीच्या नावाखाली ग्राहकांना चक्क कुत्ता बिर्याणी खाऊ घातली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनीच हा धक्कादायक आरोप केलाय. त्यांच्या या आरोपांना केंद्र सरकारच्या अॅनिमल बर्थ कंट्रोल मिशननेही दुजोरा दिलाय. कारण औरंगाबाद शहराच्या चिखलठाणा, पडेगावसारख्या काही फक्त कुत्र्यांची मुंडकी आढळून आलीत. त्यामुळे कुत्र्यांची कत्तल करून त्यांचं मांस बिर्याणीमध्ये बेमालूमपणे बिर्याणीत मिसळलं तर जात नाहीना असा, गंभीर आरोप होतोय. त्यामुळे ग्राहकांनो बिर्याणी स्वस्तः मिळतेय म्हणून ताव मारण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावधाव व्हा, कारण तुम्हाला कदाचित कुत्ता बिर्याणीही खाऊ घातली जाऊ शकते.

फक्त औरंगाबादच नाहीतर भारतातील अनेक शहरांमध्ये अशा घटना घडत असून रस्त्याच्या कडेला स्व:तात मिळणा-या बिर्याणीमध्येही ग्राहकांच्या नजरेआड कुत्र्याचं मांस वापरल्या जातं, असं निरिक्षण एबीसी अर्थात अॅनिमल बर्थ कंट्रोल मिशनच्या संचालिका मेहर मथानी यांनी नोंदवलंय. बिर्याणीत जर कुत्र्याचं मांस मिसळलेलं असेल तर हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण ते मांस अनेकदा संसर्गजन्य असतं, त्यामुळे अन्नातून विषवाधा होऊन खाणाऱ्याचा जीव देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत अॅनिमल वेलफेअर मंडळाच्या सदस्यांचं मत आहे.

औरंगाबादेत मुकुंदवाडी, चिकलठाणा पाडेगाव या परिसरात कुत्र्यांचे कापलेले मुंडकी आढळून आलीत. त्यामुळे या परिसरातल्या रस्त्यांवरील सर्व बिर्याणीच्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.

देशात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. प्रत्येक तीनशे माणसांच्या मागे एक कुत्रा, एवढी मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कुत्र्याच्या मांसाचं रॅकेट अनेक शहरांमध्ये कार्यरत असू शकतं, असंही मत त्यांनी नोंदवलंय. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बाहेर जेवायला जाताना आपल्या थाळीत कोणी आपल्या नजरेआड कुत्ता बिर्याणी तर वाढवत नाहीना, याची वेळीच खातरजमा करून घेण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...