विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे उपटले कान

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे उपटले कान

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी भोकरदन तालुक्यातील धामणा धरणाची पाहणी करून आढावा घेतला.

  • Share this:

जालना, 4 जुलै- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी भोकरदन तालुक्यातील धामणा धरणाची पाहणी करून आढावा घेतला. चार वर्षं प्रकल्प कोरडा असताना दुरुस्ती का केली नाही, अशा शब्दांत आयुक्तांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे कान उपटले.

गळती थांबवण्यासाठी ताडपत्रीची ठिगळ लावल्याच्या प्रकारावरूनही आयुक्तांनी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. सुनील केंद्रेकर यांनी भोकरदन येथील धामणा धरणाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी धरणाच्या भिंतीला ताडपत्रीचे ठिगळ लावल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांन चांगलेच झापले. भोकरदन तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने धामना धरण तब्बल 90 टक्के भरले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले असून पाणी पाझरत आहे. त्यामुळे धरणफुटी होऊन महाप्रलय येण्याची भीती परिसरातील गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. दरम्यान,आज सांडव्याच्या भिंतीवर चक्क ताडपत्रीची ठिगळ लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

धामणा धरणाच्या भिंतीला तडे, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

भोकरदन तालुक्यातील सेलूद येथे धामणा धरणाच्या (मध्यम प्रकल्पाला) भिंतीला तडे गेले असून भिंतीतून पाणी पाझरत आहे. विशेष म्हणजे धरणात 90 टक्के पाणी साठा आहे. गेल्या 5 वर्षांत प्रथमच धरणात एवढा पाणी साठा आहे. धरणाच्या भिंतीतून पाणी पाझरत असल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाफुटी घटनेची पुनरावृत्ती जालन्यात होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे. धामना धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले असून भिंतीतून मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरत आहे. गेल्या सहा दिवसांपासून भोकरदनसह परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. ज्यामुळे धामना धरणात 90 टक्के पाणी साठा झाला. गेल्या 5 वर्षांत प्रथमच धरणात एवढा मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे जाऊन पाणी पाझरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धरण अतिप्राचीन असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार देखभाल दुरुस्तीचा निर्णय घेतला जाईल. ग्रामस्थांनी घाबरण्याचे काही कारण नाही. खबरदारीचा इशारा म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथकासह सेनेच्या एका तुकडीला इथे पाचारण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुर्दाड सरकार! तडे गेलेल्या 'या' धरणाला ताडपत्रीची ठिगळं, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2019 10:07 PM IST

ताज्या बातम्या