औरंगाबादच्या उपमहापौरांनी जीवे मारण्याचा केला प्रयत्न,अभियंताचा आरोप

औरंगाबादच्या उपमहापौरांनी जीवे मारण्याचा केला प्रयत्न,अभियंताचा आरोप

दीड कोटींच्या कामाची निविदा मंजूर करण्यासाठी औताडे यांनी अँटी चेंबरमध्ये 4 तास कोंडून ठेवले

  • Share this:

औरंगाबाद, 13 सप्टेंबर : औरंगाबाद महापालिका आता राड्याची महापालिका ठरत चालली आहे. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता चरणसिंग चहल यांनी केला.

दीड कोटींच्या कामाची निविदा मंजूर करण्यासाठी औताडे यांनी अँटी चेंबरमध्ये 4 तास कोंडून ठेवले आणि शिवीगाळ केली असाही आरोप चहल यांनी केलाय.या प्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल केली.

भाजप सत्तेत आहे त्यामुळे राज्यभर भाजप गुंडगिरी करीत आहे. राज्यात भाजपचे गुंडाराज असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला.

काय आहे चरणसिंग चहल यांचा आरोप

पाईपलाईन संदर्भात काही फाईली होत्या. त्यावर सही करण्यासाठी  सभागृहात मला बोलावले होते. त्यानंतर औताडे यांनी मला त्यांच्या चेंबरमध्ये घेऊन गेले आणि नियम अटींची पुर्तता होत आहे निविदा होण्यास हरकत नाही असं सांगितलं. मी म्हटलं नियम आणि अटींची पुर्तता होत नाही हे कसं लिहू असं सांगितल्यावर त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभागृह नेते विकास जैन यांनी मध्यस्थी करून मला वाचवले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस आयुक्ताना माहिती दिली.

Loading...

मागील महिन्यात औरंगाबादमध्येही अटलजींना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र या प्रस्तावाला विरोध केल्याने एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीनला मारहाण करण्यात होती. विरोध केल्याचा राग आल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहातच त्यांची धुलाई केली होती. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगा भडकवण्याच्या आरोपाखाली सय्यद मतीनला अटक करण्यात आली आहे.  त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मतीनला चपलेनं चांगलाच चोप दिला होता. त्यामुळं भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, राज वानखेडे यांच्याविरोधातही मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपच्या नगरसेवकांना अटक आणि जामीन देण्यात आलाय.

===========================================================

VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...