08 एप्रिल : रस्त्यावर पडलेल्या रसायनावर दूध पडून झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीये. शहरातील किराडपुरा भागात ही घटना घडलीये.
किराडपुरा भागातील एफरा अनिस आणि वसीमखान हे दोघं जण दूध आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी रस्त्यावर पडलेल्या रसायनांवर दुधाची पिशवी पडली. दूध आणि रसायनांचा संयोग होऊन त्यानंतर झालेल्या स्फोटात दोघंही जखमी झालेत. यातल्या वसीम खानच्या पायाला जबर जखम झालीये. स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण होतं. घटनास्थळी एटीएसच्या पथकानंही धाव घेतली. पण झालेल्या स्फोटाचा कोणत्याही दहशतवादी घटनेशी संबध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा