S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले
  • VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले

    Published On: Aug 17, 2018 04:12 PM IST | Updated On: Aug 17, 2018 04:12 PM IST

    माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत निषेध नोंदविणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजपच्या नगरसेवकांनी अक्षराक्षः चपलेने चोपले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी कडे करून मतीन यांना सभागृहाबाहेर काढले. समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली. त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरक्षः खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी चपलेने मारले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close