News18 Lokmat

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचं निधन

राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य, साधने व प्रकाशन समितीचे ते सदस्य सचिव होते. अविनाश डोळस हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते.

News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2018 05:32 PM IST

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचं निधन

औरंगाबाद, 11 नोव्हेंबर : आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचं रविवारी पहाटे निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. हृदय विकाराच्या तिव्र झटक्यामुळे त्पांची प्राणज्योत मालवली.

आंबेडकरवादी लिखाण आणि नामांतर लढ्यात ते सहभागी होते. राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य, साधने व प्रकाशन समितीचे ते सदस्य सचिव होते. अविनाश डोळस हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते. जानेवारी १९९० मध्ये भरलेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर, जानेवारी २०११ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या १२व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं.

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी विभागप्रमुख म्हणूनही काम केलं. आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. दलित व कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी बरेच लिखाण केलं. त्यांनी बरीच पुस्तके लिहीली असून, आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने, आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य, महासंगर हा कथासंग्रह आणि सम्यकदृष्टीतून या पुस्तकांचा समावेश आहे.


 पेण ते पनवेल रेल्वे मार्ग झाला मोकळा, 'ही' आहेत वैशिष्ट्यं

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...