शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत, पोहताना बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 03:45 PM IST

शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत, पोहताना बुडून मृत्यू

औरंगाबाद, 29 जून : पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील नक्षत्रवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. प्रदीप भगवान काजळे (वय-9 वर्ष)आणि तुषार प्रकाश शिरसाठ (वय -12वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत.

नक्षत्रवाडी भागातील खदाणीकडे शुक्रवारी संध्याकाळी मृत तुषार आणि प्रदीप व इतर दोघे मित्र अशे चौघे मित्र फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर पोहायचा मोह न आवरल्याने तुषार आणि प्रदीपने पाण्यात उडी मारली. मात्र दोघेही पाण्याच्या वर आलेच नाहीत. भेदरलेल्या दोन्ही मित्रांनी तेथून पळ काढला आणि गावात कुणालाही काही सांगितले नाही.

बाहेर गेलेली मुलं बराच काळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता दोघेही पाण्यात बुडल्याचे लक्षात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. पण तोपर्यंत दोघांची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...