दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी बनला सेल्फी पॉईंट, आता होणार लिलाव

खेड येथे दाऊदच्या तीन मालमत्ता आहेत. त्यात एका तीन मजली बंगल्याचा समावेश आहे. 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 04:37 PM IST

दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी बनला सेल्फी पॉईंट, आता होणार लिलाव

रत्नागिरी, 17 जून- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी अँटी स्मगलिंग एजन्सी सोमवारी खेडमध्ये दाखल झाली आहे. संध्याकाळपर्यंत मूल्यांकणाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खेड येथे दाऊदच्या तीन मालमत्ता आहेत. त्यात एका तीन मजली बंगल्याचा समावेश आहे. 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भिंतींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहे. असे असले तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.

काही महिन्यांपूर्वी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील नागपाडा विभागात असणार हा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला होता. त्यानंतर आता तस्करी विरोधी संस्थेने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या 14 मालमत्तांची किंमत ठरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे कुख्यात डॉन दाऊदच्या गावातील 14 मालमत्तांवर लवकरच जप्ती येणार आहे.

असे सांगितले जाते की, दाऊद या बंगल्यात अनेकदा राहत होता. या मालमत्तांमध्ये एक पेट्रोलपंप आहे. तसेच एक फ्लॉट देखील आहे. पुण्यातील मुल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या मालमत्तांची किंमत ठरवण्यास अँटी स्मगलिंग एजन्सीने सांगितले आहे. खेडमधील मुख्य मालमत्ता ही हसीना पारकर हिच्या तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमीना बी यांच्या नावावर आहे. हे सगळे लोक 1980 दशकात खेडच्या बंगल्यात यायचे. दाऊदचे बालपणही खेडमधील मुंबके गावात गेले आहे.

दाऊदचा बंगला पर्यटकांसाठी बनला सेल्फी पॉईंट..

Loading...

1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भिंतींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहेत. तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.

38 वर्षांपूर्वी सरकारने सील केला होता हा बंगला..

विविध गुन्ह्यांमध्ये दाऊदचा हात असल्याच्या संशयावरुन 38 वर्षांपूर्वी दाऊदचा हा बंगला सरकारद्वारे सील केला होता. पण काही वर्षांपासून या बंगल्यात अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याचा पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या घराकडे काही पोलिसांना तैनात केले आणि याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सूचना केल्या. आता हा बंगला अत्यंत जीर्ण झाला असून तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे हा बंगला ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली होती.


VIDEO: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टोळक्याकडून बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 04:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...