पोलिसांचा हलगर्जीपणा..अंगावर डिझेल ओतून एकाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

पोलिसांचा हलगर्जीपणा..अंगावर डिझेल ओतून एकाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

कोर्टाचा आदेश असताना देखील आनंद नगरचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीला गेलेल्या गाडीचा तपास केला नाही. पोलिसांच्या या हलगर्जीपणाला कंटाळून एका नागरिकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

उस्मानाबाद, 13 जून- कोर्टाचा आदेश असताना देखील आनंद नगरचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीला गेलेल्या गाडीचा तपास केला नाही. पोलिसांच्या या हलगर्जीपणाला कंटाळून एका नागरिकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयात घडली. लहू रामा खंडागळे असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

काय आहे हे प्रकरण?

लहू खंडागळे यांनी मालकीची गाडी चोरी झाल्या नेहल्याची तक्रार आनंद नगर पोलिसात दिली पण त्यांच्या तक्रारी वर पोलिसांनी कुठलाच तपास केला नाही त्यामुळे त्यांनी वरिष्ठ पोलीसा कडे तक्रारी केल्या पण त्यांनी दखल न दिल्याने त्यांनी शेवटी न्यायालयात दाद मागितली पण पोलिसांनी त्यांना आधार दयाचा सोडून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करत खंडागळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात च आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला।मात्र त्यांना पोलिसांनी वेळेत रोखल्याने पुढचा अनर्थ टळला दरम्यान पोलिसांनी तपास नाही केला तर मला जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याचे खंडागळे यांनी सांगितले तर हा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

नवविवाहितेचा जळीत मृतदेह आढळला, माहेरच्यांनी केला हा आरोप

वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोयाळी भिसडे येथे विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला आहे. दिपाली काळे अशी मृत महिलेची ओळख पटली आहे. सासरच्या लोकांनी दिपालीची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा माहेरच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दिपालीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

6 महिन्यांपूर्वी झाला होता विवाह...

हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके येथील दिपालीचा विवाह कोयाळी येथील शाम काळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यांत दिपालीची सासरी छळ केला जात होता. माहेरावरून 7 लाख रुपये आणण्यासाठी मानसिक त्रास देत तिचा खून केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. जोपर्यंत दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.


औरंगाबाद मनपामध्ये गोंधळ, एमआयएम-शिवसेना आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 04:19 PM IST

ताज्या बातम्या