पत्नीच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न, पतीच्या हातात बेड्या

पत्नीच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न, पतीच्या हातात बेड्या

पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पनवेलमधील शेडुंग जवळील बेर्ले गावात हा घटना घडली आहे. पिंकी कातकरी (वय-19) असं पीडित महिलेचं नाव आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 24 जून- पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पनवेलमधील शेडुंग जवळील बेर्ले गावात हा घटना घडली आहे. पिंकी कातकरी (वय-19) असं पीडित महिलेचं नाव आहे. ही आदिवासी महिला नदीवर कपडे धुण्यास गेली होती. पती आदेश कातकरी हा मागून आला आणि त्याने तिच्या डोक्यात दगड घातला.

या हल्ल्यात पिंकी गंभीर जखमी झाली आहे. पिंकीला कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. रविवारी रात्री पोलिसांनी आरोपी आदेश याला अटक केली आहे.

अर्धवट उपचार करून घरी पाठवले..

दरम्यान, पिंकीला पैशाअभावी अर्धवट उपचार करून घरी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती गावकऱ्यांना समजताच तिला पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

गोवा महामार्गावर अपघात, 1 ठार, 6 जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पेण रेल्वे स्टेशन समोर भीषण अपघात झाला आहे. या अपघाता एक जण जागेवरच ठार झाला असून 6 जखमी झाले आहेत. मुंबईकडे जाणारी भरधाव गाडीने डंपरला मागून जोरदार धडक दिली. यात विनोद वसंत चाळके (वय-42, रा. देवरूख) यांचा जागेवर मृत्यू झाला आहे.

विजेचा शॉक लागून बैल ठार..

बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील व्हरकटवाडी येथील शेतकऱ्यावर ऐन पेरणीच्या मोसमात संकट कोसळले आहे. विजेचा शॉक लागून बैल दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. व्हरकटवाडी येथिल बाजीराव दामोदर व्हरकटे हे शेतकरी मान्सूनचा पाऊस पडल्याने आपल्या शेतात कापूस पेरणीसाठी रेघोट्या मारत होते. विजेच्या खांबालगत तारेला वीज उतरल्याने तारेला स्पर्श होऊन बैल जागीच दगावला. दुसरा बैल थोडक्यात बचावला.

बाजीराव व्हरकटे यांनी काही दिवसांपूर्वी दीड लाख रुपयांला बैलजोडी घेतली होती. त्यापैकी एक बैल दगावल्याने पेरणी खोळंबल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले. विद्युत कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2019 10:29 AM IST

ताज्या बातम्या