अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकाला फिल्म सेटवर रॉडने मारहाण

अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 01:00 PM IST

अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकाला फिल्म सेटवर रॉडने मारहाण

मुंबई, 20 जून- अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (19 जून) मीरा रोड परिसरात घोडबंदर येथे शुटिंगदरम्यान घडली. या मारहाणीत निर्माता साकेत सावनी यांच्यासह काही स्टाफला दुखापत झाली आहे. माही गाडीत गेल्याने तिला किरकोळ दुखापत झाली.

मिळालेली माहिती अशी की, घोडबंदर येथे सेटवर 'फिक्सर' या वेबसीरिजचे शूटिंग सुरु होती. यात माही गिल प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान हल्लेखोरांनी सेटवर जाऊन लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी स्टाफला बेदम मारहाण केली. कोणतीही चर्चा न करता परवानगीशिवाय शूटिंग करता येणार नाही, असे हल्लेखोरांनी सांगितले. यावेळी महिला कलाकारांनाही धक्काबूक्की करण्यात आली. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कृष्णा सोनार (वय-34), सोनू विरेंद्र दास (वय-24), सुरज शर्मा (वय-29) अशी आरोपींची नावं आहेत. तिघेही फिल्म सेट लोकेशन मॅनेजर आहेत. चौथा आरोपी रोहित गुप्ता हा फरार आहे. आरोपींवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडवणे असे आरोप करण्यात आले आहेत.

माहीने पोलिसांनाच संबोधले गुंड..

'फिक्सर'शोचे दिग्दर्शक तिग्माशू धुलिया यांनी एक व्हिडिओ टि्वट केला आहे. अभिनेत्री माही गिल आणि निर्माता साकेत सावनी यांना दुखापत झाल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे. पोलिसांच्या कृतीवर माही गिलसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. माहीने तर पोलिसांना गुंड म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनीही मदतीऐवजी त्रासच दिल्याची तक्रार माहीसह दिग्दर्शकांनी केली आहे.


Loading...

मद्यधुंद महिलेचे भररस्त्यात तमाशा, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2019 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...