S M L

हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी दहशतवादी टोळी, 'सनातन'चे साधक सदस्य - ATS चा खळबळजनक दावा

सदर दहशतवादी टोळी भारताची एकता, अखंडता, सुरक्षा व सार्वभौमत्व यांना धोका पोहोचवण्याच्या उद्देशानेच जमवाजमव.

Updated On: Dec 5, 2018 05:46 PM IST

हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी दहशतवादी टोळी, 'सनातन'चे साधक सदस्य - ATS चा  खळबळजनक दावा

विवेक कुलकर्णी, मुंबई, 5 डिसेंबर : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसनं मुंबईच्या एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. 6843 पानांचं हे आरोपपत्र असून यात 12 आरोपींचा यात उल्लेख आहे. यातील सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे हे आरोपी सनातन संस्था तसंच हिंदू जनजागृती समितीचे आणि तत्सम संघटनांचे सदस्य असल्याची एटीएसनं आरोपपत्रात माहिती दिली आहे. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी दहशतवादी टोळी तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


युएपीए, स्फोटक पदार्थाचा कायदा, आर्म्स ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ९ जणांना अटक करण्यात आली असून आणखी तीन हव्या असलेल्या अारोपींचा तपास सुरु असल्याची माहिती आरोप पत्रात देण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे या शहरात घातपात करणार अशी माहिती मिळाल्यानंतर एटीएसनं कारवाई केली होती.


आरोपींची नावं

Loading...


१) शरद कळसकर

२) वैभव राऊत

३) सुधन्वा गोंधळेकर

४) श्रीकांत पांगारकर

५)अविनाश पवार

६) लीलाधर लोधी

७)वासुदेव सूर्यवंशी

८) सुजीथ कुमार

९) भारत कुरणे

१०) अमोल काळे

११) अमित बड्डी

१२) गणेश मिस्किन


कोणाकडे काय सापडलं


शरद कळसकर

घरी बाॅम्ब बनविण्याची कृती असलेल्या दोन हस्तलिखित चिठ्ठ्या


 वैभव राऊत

२० जिवंत गावठी बाॅम्ब

२ जिलेटिन कांड्या

४ ईलेक्ट्रिक डिटोनेटर्स

२२ नाॅन ईलेक्ट्रिक डिटोनेटर्स

POISON लिहिलेल्या १ लिटरच्या २ बाटल्या

वेगवेगळ्या स्फोटक पावडरी


तपासादरम्यान नालासोपारा-ठाणे, नातेपुते-सोलापूर, सातारा, साकळी जळगाव या ठिकाणांहून पुढील गोष्टी जप्त


२३ जिवंत गावठी बाॅम्ब

१५ पिस्तुल

१ बॅरल

६ पिस्तुल मॅग्झीन

३ अर्धवट पिस्तुल मॅग्झीन

७ पिस्तुल स्लाईड

४१ जिवंत काडतुसं

गावठी बाॅम्ब

मेमरी कार्ड्स

८ मोटार वाहनांच्या नंबर प्लेट्स

‘क्षात्रधर्म साधना’ पुस्तकाच्या प्रती

डाय-या


तसंच पुणे, नालासोपारा-ठाणे, सातारा, कोवाड-कोल्हापूर, बीड इथून २ मोटार कार, ५ मोटार सायकली तसंच मोटार सायकलीचे तोडून वेगळे केलेले भाग जप्त करण्यात आलेत .


सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीबद्दल आरोपपत्राबद्दल एटीएसनं आरोपपत्रात म्हटलंय की,


“तपासादरम्यान आरोपी यातील सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व अन्य काही तत्सम संघटनांचे सदस्य असून त्यांनी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे हिंदू राष्ट्र निर्मितीच्या उद्देशानं प्रेरित होऊन आपपसात संगनमत करुन समविचारी युवकांची दहशतवादी टोळी निर्माण केल्याचं आढळून अालं आहे.


सदर दहशतवादी टोळी भारताची एकता, अखंडता, सुरक्षा व सार्वभौमत्व यांना धोका पोहोचवण्याच्या उद्दीष्टानं देशी बनावटीचे पिस्टल, गावठी बाॅम्ब इत्यादीचा वापर करुन तथाकथित हिंदू धर्म, रुढी, प्रथा यांच्या विरोधात विडंबन, वक्तव्य, लिखाण करणा-या व्यक्ती व कार्यक्रमांना लक्ष्य करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचं आढळून आलं आहे.


याचाच एक भाग म्हणून डिसेंबर २०१७ मध्ये पुणे येथे आयोजित पाश्चात्य संस्कृतीचा पुरस्कार करणारा ‘सनबर्न’ या संगीताच्या कार्यक्रमास आरोपींनी लक्ष्य करुन कार्यक्रमात गावठी बाॅम्ब, पेट्रोल बाॅम्ब, अग्नीशस्र तसंच दगडफेक इत्यादीद्वारे घातपाती कारवाया करुन जनतेत दहशत निर्माण करण्याकरता या कार्यक्रमाच्या ठिकाणी रेकी केली.


आणि घातपाताची तयारी केली पण एका आरोपी रेकी करताना सीसीटीव्हीच्या कॅमेरात आल्याच्या संशयावरून पूर्ण तयारी होऊनही घातपाताची योजना रद्द झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय. तसंच सदर दहशतवादी टोळीनं हिंदू धर्म, धर्म, रुढी, परंपरा यावर टिकाटिप्पणी करणारे साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक व्यक्ती यांना लक्ष्य करुन त्यांची रेकी केल्याचं तपासात उघड झालंय.”

Video : लग्नात परिणितीने लपवले निकचे बूट आणि किती रुपये मागितले पाहा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 05:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close