मुंबईत आणि औरंगाबादमध्ये ATSची छापेमारी, ISIS चे 9 समर्थक ताब्यात!

मुंबईत आणि औरंगाबादमध्ये ATSची छापेमारी, ISIS चे 9 समर्थक ताब्यात!

मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांच्या स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

  • Share this:

विवेक गुप्ता, मुंबई 22 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएस ने जोरदार कारवा केली आहे. मुंबई जवळच्या मुंब्रा आणि औरंगबाद इथं कारवाई करत अनेक ठिकाणी छापे घातले असून ISIS च्या 9 समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांच्या स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. एटीएस गली काही दिवस काही लोकांवर पाळत ठेवून होतं. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून गुप्तपणे ही कारवाई सुरू होती.

ताब्यात घेतलेल्यांमध्ये मुंब्र्यातून 5 आणि औरंगबादमधून 4 तरुणांचा समावेश आहे. त्या सर्वांची एटीस कसून चौकशी करत आहे. त्या सगळ्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि ईमेलही तापासण्यात येत आहेत.


ISIS चे काही एजंट्स भारतातल्या तरुणांना चिथावणी देऊन त्यांना भरकटविण्याचा प्रयत्न करत असतात. या आधीही अनेकांना अटक करण्यात आली होती.


दिल्लीतही झाली होती कारवाई


गेल्याच महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 ठिकाणी छापे घातले होते. दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये ISIS संघटनांशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली होती. या सर्च ऑपरेशनमध्ये NIA व्यतिरिक्त उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी संघटनांचादेखील सहभाग होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस मुख्यालय आणि दिल्लीतल्या RSS ऑफिससह अनेक मोठ्या जागा  दहशतवादी संघटनांच्या रडारवर होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या