नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला घाटकोपरमधून अटक

या सर्व आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2018 12:15 PM IST

नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला घाटकोपरमधून अटक

मुंबई, २५ ऑगस्ट- नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसने शुक्रवारी रात्री घाटकोपरमधून एकाला अटक केली आहे. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. ३० वर्षीय या तरुणाचे नाव अद्याप समोर आले नाही. या प्रकरणात एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि अजून तीन आरोपींना अटक केली होती. या सर्व आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई, नालासोपारा, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया केल्याचा, खूनाचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा तरुण कोण आहे आणि त्याचा या प्रकरणाशी संबंध काय या सगळ्याची माहिती पोलिसांनी अद्याप दिली नसून, शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतरच सगळ्या गोष्टींचे तपशील समोर येतील असे म्हटले जात आहे.

दरम्यान, दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी एसीएस आणि सीबीआयच्या पथकाने मंगळवारी पहाटे आणखीन तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तीन संशयीतांपैकी दोन संशयीत हे सचिन अंदुरेचे मेहुणे आहेत तर एक धावणी मोहल्ल्यातील संशयीताला ताब्यात घेतलं आहे. पथकाने देवळाई येथील मनजीत प्राईड अपार्टमेन्टमधून या तिघांना ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आरोपींकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत या तीनही आरोपींची एटीएसच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली.

पथकाने या छाप्यात सातारा पोलिसांची मदत घेतली. मंगळवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी मनजीत प्राईड अपार्टमेन्टमध्ये छापा घालताना अपार्टमेन्टच्या रजिस्टरमध्ये पथकाने  इन आणि आऊटची नोंद केली. तसेच छापा टाकताना सातारा पोलिसांनाही घरात येऊ दिले नाही. इमारतीमधून कोणालाही आत सोडू नका तसेच बाहेरही जायला देऊ नका अशा सुचना पथकाने सातारा पोलिसांना दिल्या होत्या.

VIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2018 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close