पुण्यात 15000 विद्यार्थ्यांनी केलं सामूहिक श्रीसुक्त आणि अथर्वशीर्ष पठण

पुण्यात 15000 विद्यार्थ्यांनी केलं सामूहिक श्रीसुक्त आणि अथर्वशीर्ष पठण

पुण्यातील 150 शाळांमधील जवळपास पंधरा हजार विद्यार्थी या पठणात सहभागी झाले होते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्रीसुक्त पठण महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीनं घेतलं जातं

  • Share this:

पुणे, 22 सप्टेंबर: पुण्यातील सारसबाग इथं प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या वतीनं सामूहिक श्रीसुक्त आणि अथर्वशीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली 26 वर्ष मंदिराचे विविध कार्यक्रम सुरु असतात.

पुण्यातील 150 शाळांमधील जवळपास पंधरा हजार विद्यार्थी या पठणात सहभागी झाले होते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्रीसुक्त पठण महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीनं घेतलं जातं. यावेळी महापौर मुक्ता टिळक , अभिनेता पुष्कर श्रोत्री , मोहन आगाशे , गायिका मुग्धा वैशंपायन आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह कलाकारांनी वाढवला. मुलांना संस्कृती  कळावी त्यांच्यावर चांगल्या विचारांचा प्रभाव पडवा यासाठी दरवर्षी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं.गणेशोत्सवात ही अथर्वशीर्ष पठणाचं आयोजन पुण्यात करण्यात येतं. त्याला ही चांगला प्रतिसाद मिळत असतो.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2017 10:17 AM IST

ताज्या बातम्या