S M L

महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जोरदार स्वागत

पुणेरी पगडी घालून तिची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी तिला आनंदाश्रू अनावर झाले.

Sonali Deshpande | Updated On: Apr 15, 2018 01:27 PM IST

महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जोरदार स्वागत

पुणे, 15 एप्रिल : महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत आज मायदेशी परतली. ती पुण्यात आली तेव्हा तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पुणेरी पगडी घालून तिची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी तिला आनंदाश्रू अनावर झाले.

राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत तेजस्विनीनं सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवलं होतं. त्यामुळे आज तिच्या स्वागताला भरपूर गर्दी झाली होती. तिच्या पतीसह कुटुंबीयही आवर्जून तिच्या स्वागताला हजर होते.

तेजस्विनी मूळची कोल्हापूरची. तिचे वडील रवींद्र सावंत नौदलामध्ये अधिकारी होते.  तेजस्विनीला 2011 साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तेजस्विनी गेल्या 14 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या क्रीडा प्रकारात आहे. 2004 साली तिनं इस्लामाबादमध्ये South Asian Sports Federation Gamesमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.

तेजस्विनीच्या स्वागताचा पहा हा व्हिडिओ-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close