News18 Lokmat

कल्याणमधील नेवाळी विमानतळ आंदोलनाला हिंसक वळण

कल्याणमध्ये नेवाळी परिसरात सरकारनं विमानतळासाठी जबरदस्तीनं जागा संपादित केल्याचं सांगत, तिथल्या शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलंय. कल्याण-मलंग रस्ता शेतकऱ्यांनी रोखून धरलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2017 12:42 PM IST

कल्याणमधील नेवाळी विमानतळ आंदोलनाला हिंसक वळण

22 जून : कल्याणमध्ये नेवाळी परिसरात सरकारनं विमानतळासाठी जबरदस्तीनं जागा संपादित केल्याचं सांगत, तिथल्या शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलंय. कल्याण-मलंग रस्ता शेतकऱ्यांनी रोखून धरलाय. आपल्याच मालकीच्या शेतावर पेरणी करायला बंदी केल्यानं शेतकरी आता संतप्त झालेत.

शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक झालाय. बदलापूर हायवेवरील सर्व दुकानं बंद केली आहेत. पोलिसांच्या गाडीवरही तुफान दगडफेक केलीय. शेतकऱ्यांनी हे आंदोलन गनिमी पद्धतीनं 10 ठिकाणी केल्यानं पोलीस हतबल झालेत. डोंबिवली-बदलापूर रोड पूर्ण बंद आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी 25 ट्रक्सच्या काचा फोडल्यात. रस्त्यावर टायर्स पेटवलेत.

 

कल्याणचे आमदार गणपत गायकवाड IBNलोकमतशी बोलताना म्हणाले, इथे 17 गावातले शेतकरी शेती करतायत. त्यांच्याशी संवाद न साधताच त्यांच्या जमिनी विमानतळासाठी घेतल्या गेल्यात. आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं ते म्हणाले.

Loading...

शेतकरी आंदोलनामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांच्यासह  पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत.

दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गणचा वापर केल्याने चार ते पाच आंदोलक जखमी झालेत. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी ही माहिती दिलीय. तसंच या वादावर तोडगा काढण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे आंदोलक शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत.

नेवाळी शहरापासून 607 कि.मी. दूर आहे. ब्रिटीश काळात ब्रिटिशांनी इथे तळ उभारले होते. या भागाच्या आजूबाजूला कल्याण, अंबरनाथ अशी महत्त्वाची शहरं असल्यानं सरकार इथे विमानतळ उभारण्याचा विचार करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 10:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...