S M L

नागपूर मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा बळी

मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात या मुलाच्या आईची दुचाकी घसरली. आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कूलबसखाली चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झालाय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 2, 2017 03:23 PM IST

नागपूर मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा बळी

नागपूर, 02 आॅगस्ट : नागपुरात मेट्रोच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेलाय.  मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात या मुलाच्या आईची दुचाकी घसरली. आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कूलबसखाली चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झालाय.

नागपूरच्या हिंगणा रोडवरील सेंट झेव्हियर्स शाळेसमोर ही घटना घडलीय. रितेश मसराम असं या मुलाचं नाव आहे. या घटनेनंतर स्कूलबस चालकाला अटक करण्यात आलीय. गेल्या पंधरा दिवसात याच ठिकाणी अपघाताची ही दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 03:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close