नववधूच्या मांडवात बैलजोडीचा धुमाकूळ, 15 जण जखमी

देवळा तालुक्यातील कुंभार्डे इथे आज सकाळी मांडवाचा कार्यक्रम सुरू असताना बैलजोडी उधळल्याने नववधूच्या भावासह १२ ते १५ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 03:15 PM IST

नववधूच्या मांडवात बैलजोडीचा धुमाकूळ, 15 जण जखमी

कुंभार्डे, 20 फेब्रुवारी : देवळा तालुक्यातील कुंभार्डे  इथे आज सकाळी मांडवाचा कार्यक्रम सुरू असताना बैलजोडी उधळल्याने  नववधूच्या भावासह १२ ते १५ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

कुंभार्डे येथील दादाजी विष्णू केदारे यांच्या कन्येचा उद्या विवाहसोहळा आहे.  त्यानिमित्त आज मांडवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी वाजत गाजत मांडवाची बैलजोडीने मिरवणूक निघत होती. यादरम्यान, बँडच्या आवाजाने बैलगाडीचे दोन्ही बैल उधळले.  यादरम्यान, बैलगाडीच्या पुढे चालत असणारा नववधूचा भाऊ राहुल यांच्यासह इतर १२ ते १५ नातेवाईक आणि भाऊबंद गंभीर जखमी झाले.  जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...