चाळीसगावमध्ये नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात यश

चाळीसगावमध्ये नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात यश

हैदराबादचे शूटर नवाब शहापत अली खान आणि त्यांच्या टीमनं ७ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला मारलं. शंकर तिरमली यांच्या शेतात बिबट्याला गोळी घालण्यात आली.

  • Share this:

10 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर यश आलंय. हैदराबादचे शूटर नवाब शहापत अली खान आणि त्यांच्या टीमनं ७ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला मारलं. शंकर तिरमली यांच्या शेतात बिबट्याला गोळी घालण्यात आली.

वरखेडे खुर्दच्या खडका भागात दुपारी साडे चार वाजता बिबट्या पहिल्यांदा दिसला. त्यानंतर तब्बल ६ तास बिबट्या नवाब खान यांना चकवा देत होता. अखेर रात्री साडे दहा वाजता त्याला ठार करण्यात यश आलं.

रात्री उशिरा बिबट्याला चाळीसगावला आणलं गेलं. त्याचं शवविच्छेदनही करण्यात येणार आहे. हा बिबट्या नरभक्षक का झाला, याचा अहवालही सरकारला सादर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 10:35 AM IST

ताज्या बातम्या