कोल्हापूरमध्ये खासगी बसला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये खासगी बसला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू

बस चालकाच्या प्रसंगावधानानं इतर 18 प्रवाशांचा जीव बचावला आहे. तर जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 24 नोव्हेंबर :  गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ एका बसला अचानक आग लागली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानानं इतर 18 प्रवाशांचा जीव बचावला आहे. तर जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसच्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही खासगी बस गोव्याहून पुण्याच्या दिशेनं जात होती. आग लागल्याचं लक्षात येताच ड्राइवरनं प्रवाशांना ओरडून बाहेर काढलं. या अपघातात बंटी भट आणि  विकी भट यांचा मृत्यू झालाय. आगीत अनेकजण किरकोळ जखमी झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 09:23 AM IST

ताज्या बातम्या