S M L

गांजूर गावात दुष्काळानं पाडल्या जातीपातीच्या भिंती

गांजूरच्या गावकुसाबाहेर राहणारे मधुकर भोसले.यांच्या वाड्यातल्या बोअरवेलला भरपूर पाणी लागलंय.त्यांनीही ते पाणी गावकऱ्यांसाठी मोफत पुरवलंय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 25, 2017 01:37 PM IST

गांजूर गावात दुष्काळानं पाडल्या जातीपातीच्या भिंती

सिध्दार्थ गोदाम, 25 एप्रिल : कधी काळी देशात दलितांना पिण्याचं पाणीही वेगळं होतं.म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.राज्यातही दलितांचे पाणवटे वेगळे होते. गाव खेड्यांमध्ये जातीभेदाचे चटके दलितांना सहन करावे लागत होते.मात्र दुष्काळानं जातीपातीच्या या भिंती पाडण्याचं काम केलंय.लातूरामधल्या गांजूर गावात ही सामाजिक दरी पुसून गेलीय.

लातूर जिल्ह्यातलं गांजूर नावाचं छोटसं गाव. दुष्काळाच्या झळा गावाला नवीन नाहीयत. गावाच्या बाजूनं वाहणारी मांजरा नदी कोरडीठाक पडलीय. नदीला पाणी नसल्यानं गावात पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

गांजूरच्या गावकुसाबाहेर राहणारे मधुकर भोसले.यांच्या वाड्यातल्या बोअरवेलला भरपूर पाणी लागलंय.त्यांनीही ते पाणी गावकऱ्यांसाठी मोफत पुरवलंय. गावातील सर्व जाती धर्माचे गावकरी भोसले यांच्या वाड्यातून पाणी घेऊन जातात.

गांजूर गावातील इतर दोन बोअरवेलला पाणी आहे.  मात्र हे पाणी पूर्ण गावाला अपुरं पडतंय.पहाटे पाचपासूनच गावातील महिला भोसले वाड्याकडे पाण्यासाठी जातात.

मधुकर भोसले यांचे भोरले भाऊ रघूनाथ भोसले यांचं बालपण गांजूरात गेले. त्यांच्या बालपणी त्यांना वेगळ्या नळावरून पाणी भरावं लागत असल्याची आठवण ते सांगतात.मात्र आता गावकरी जातपात विसरून त्यांच्या वाड्यात पाणी भरायला येतात याचं त्यांना समाधान वाटतंय.

Loading...
Loading...

गांजूर गाव हे जातीपातीमध्ये  जखडलेल्यांसाठी खऱ्या अर्थानं शिकवण देणारं आहे. गांजूरसारख्या घटना महाराष्ट्रात घडायला वेळ लागणार नाही. कारण आपली परंपरा फुले शाहू आंबेडकरांची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 01:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close