Elec-widget

चक्क रुग्णवाहिकेत लागलं लग्न!

चक्क रुग्णवाहिकेत लागलं लग्न!

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील गणेश आत्राम आणि पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील वैशाली सोयाम यांचा विवाह ठरला.

  • Share this:

महेश तिवारी, चंद्रपूर, 11 मे : सध्या लग्नाचा हंगाम राज्यभरात सुरू आहे. मात्र लग्न कधी चक्क रुग्णवाहिकेत होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र असं घडलंय तेही चंद्रपूर जिल्ह्यात. लग्न सोहळा रंगलेला,  वर आणि वधू पक्षाकडील वऱ्हाड्यांची गर्दी जमलेली असताना सगळ्यांना लग्नाची प्रतीक्षा होती.

अशा अवस्थेत एक रुग्णवाहिका तिथे येते आणि चक्क रुग्णवाहिकेतच  त्या वधूशी वराचा विवाह होतो. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील गणेश आत्राम आणि पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील वैशाली सोयाम यांचा विवाह ठरला. दोन्ही पक्षांची तयारी पूर्ण झाली. मात्र,लग्नाच्या 2 दिवस अगोदर वधू वैशालीची तब्बेत अचानक बिघडली. लग्नाच्या पत्रिकेनुसार सगळे वऱ्हाडी आणि गावातले निमंत्रितही लग्नात पोहचले. आता काय करावे.? असा प्रश्न दोन्ही पक्षांकडील मंडळींना पडला. मग काय चक्क वधूला रुग्णवाहिकेतून लग्नमंडपात आणण्यात आले आणि वऱ्हाड्यांच्या साक्षीने शुभमंगल पार पडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2018 01:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...