चाकणमध्ये ई सेवा केंद्रच देतंय बोगस आधारकार्ड

शेतकरी कर्जमाफीत आधारकार्डचा घोळ कायम असताना चाकण उद्योगनगरीत शासन मान्य महा ई सेवा केंद्रात पैसे घेऊन बोगस आधारकार्ड काढून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2017 10:40 AM IST

चाकणमध्ये ई सेवा केंद्रच देतंय बोगस आधारकार्ड

02 डिसेंबर : शेतकरी कर्जमाफीत आधारकार्डचा घोळ कायम असताना चाकण उद्योगनगरीत शासन मान्य महा ई सेवा केंद्रात पैसे घेऊन बोगस आधारकार्ड काढून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण उद्योग नगरीचा विस्तार झपाट्यानं वाढतोय. आणि रोजगारासाठी राज्यातून, परराज्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सरकारमान्य महा ई सेवा केंद्रात बनावट आधारकार्ड लिंक होत असल्याचा प्रकार समोर आलाय.

काल जिल्हा महसूल, प्रांत आणि पोलिसांनी सापळा रचून या आधारकार्डच्या बोगस धंद्यावर कारवाई केली, ज्यात महा ई सेवा केंद्राच्या चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून काही गोष्टी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सरकारी कामकाज आणि बोगस व्यक्तींच्या तपासणीसाठी ही आधारकार्ड सक्ती करण्यात आली, हेच काम करण्यासाठी महा ई सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली. ही केंद्र, तालुका, गाव या स्तरांवर सुरूही झाली , पण याच महा ई सेवा केंद्रांवरच अशी बोगस कामे सुरू झाल्याने प्रशासनच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...