काँग्रेस नगरसेवकाच्या वाढदिवसाला उधळल्या नोटा,व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस नगरसेवकाच्या वाढदिवसाला उधळल्या नोटा,व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांच्या वाढदिवसाला पैसे उधळण्यात आले. 30 नोव्हेंबरला वाढदिवसाच्या सार्वजानिक कार्यक्रमात स्वतः नगरसेवक अफसर खान डॉन चित्रपटाच्या गाण्यावर नाचत होते.

  • Share this:

औरंगाबाद, 04 डिसेंबर : काही राजकीय नेत्यांना पैशांचं ओंगळवाणं प्रदर्शन करण्याची सवय असते. लग्नामध्ये, वाढदिवसाला काही नेते पैसे उधळतात. काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांच्या वाढदिवसाला पैसे उधळण्यात आले.

30 नोव्हेंबरला वाढदिवसाच्या सार्वजानिक कार्यक्रमात स्वतः नगरसेवक अफसर खान डॉन चित्रपटाच्या गाण्यावर नाचत होते. तर काही कार्यकर्ते कोऱ्या करकरीत नोटा त्यांच्यावर उधळत होते. पण कमी किमतीच्या नोटा उधळल्या असं समर्थन अफसर खान यांनी केले आहे.

नेत्यांनी पैशांचं असं प्रदर्शन करणं नक्कीच अयोग्य आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पैशाची अशी उधळण केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 05:23 PM IST

ताज्या बातम्या