औरंगाबादमध्ये 81वर्षाच्या डाॅक्टरवर तलवारीनं हल्ला,हल्लेखोराला अटक

काही दिवसांपूर्वी गादिया विहारमध्ये राहणारे डॉक्टर पांडुरंग काळे यांनी आपल्या घरासमोरील शेवग्याच्या शेंगा तोडणाऱ्या एका युवकाला हटकलं होतं. याचाच राग मनात धरून त्यानं मोटरसायकलवर घरी जाणाऱ्या या डॉक्टरवर तलवारीने हल्ला केला.

Sonali Deshpande | Updated On: Jun 1, 2018 04:23 PM IST

औरंगाबादमध्ये 81वर्षाच्या डाॅक्टरवर तलवारीनं हल्ला,हल्लेखोराला अटक

औरंगाबाद, 01 जून : एकीकडे औरंगाबादमध्ये ऑनलाईन शस्त्राची खरेदी होते आहे तर दुसरीकडे शहरात गादिया विहार बागांमध्ये राहणाऱ्या एका 81 वर्षीय डॉक्टरवर तलवारीने हल्ला करण्यात आलाय. याचं कारणही अतिशय शुल्लक आहे.

काही दिवसांपूर्वी गादिया विहारमध्ये राहणारे डॉक्टर पांडुरंग काळे यांनी आपल्या घरासमोरील शेवग्याच्या शेंगा तोडणाऱ्या एका युवकाला हटकलं होतं. याचाच राग मनात धरून त्यानं मोटरसायकलवर घरी जाणाऱ्या या डॉक्टरवर तलवारीने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close