कर्जमाफी हा निव्वळ आकड्यांचा खेळ, सरसकट कर्जमाफी हवी-अशोक चव्हाण

कर्जमाफीच्या निर्णयात अनेक जाचक अटी आणि शर्थी आहे.त्यामुळे 1.50 लाखांपर्यंतची मर्यादा नको, सरसकट कर्जमाफी हवी आहे अशी मागणीही चव्हाणांनी केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2017 07:05 PM IST

कर्जमाफी हा निव्वळ आकड्यांचा खेळ, सरसकट कर्जमाफी हवी-अशोक चव्हाण

27 जून : शिवसेना पाठोपाठ काँग्रेसनेही आता शेतकरी कर्जमाफीमध्ये पारदर्शकतेची मागणी केली आहे. कर्जमाफीची घोषणा आणि वस्तुस्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. सरकारने आकड्यांचा खेळ करण्याचं काम केलंय अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीये.

देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांनी कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीची घोषणा ही फसवी असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे अशी टीका केलीये.

तसंच कर्जमाफीच्या निर्णयात अनेक जाचक अटी आणि शर्थी आहे.त्यामुळे 1.50 लाखांपर्यंतची मर्यादा नको, सरसकट कर्जमाफी हवी आहे अशी मागणीही चव्हाणांनी केली.

सहकार मंत्री म्हणतात की, 36 लाख शेतकाऱ्यांवर 1.50 लाखांचं कर्ज आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात की, 40 लाख शेतकऱ्यांवर 1.50 लाख कर्ज आहे. सरकारमधील मंत्र्यांत एक वाक्यता नाही असंही चव्हाणांनी निदर्शनास आणून दिलं.

2008 साली आम्ही जी कर्जमाफी केली होती. त्यात शेतकऱ्यांचं 14 हजार कोटींचं कर्जमाफ झालं होतं. भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी 34 हजार कोटी आहे. पण तुलनात्मक दृष्ट्या आम्ही केलेली कर्जमाफी अधिक मोठी होती असा दावाही अशोक चव्हाणांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...