S M L

वाशिमच्या माजी महिला जि.प.अध्यक्षासह 5 जणांनी केला आसिफ खानचा खून

वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांचा 6 जणांनी मिळून खून केला असल्याची माहिती अकोला पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

Updated On: Aug 21, 2018 09:57 PM IST

वाशिमच्या माजी महिला जि.प.अध्यक्षासह 5 जणांनी केला आसिफ खानचा खून

अकोला, 21 ऑगस्ट : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांचा 6 जणांनी मिळून खून केला असल्याची माहिती अकोला पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी आरोपी असलेल्या वाशिमच्या माजी जि.प. अध्यक्ष ज्योती गणेशपुरेसह आणखी दोघांन ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

16 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेले वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांचा निर्घृण खून झाल्याचे रविवारी रात्री पोलीस तपासात समोर आले होते. मारेकऱ्यांनी प्रथम त्यांचा मूर्तिजापूर येथे खून केला आणी त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर पुरामध्ये फेकून दिला. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले. ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्यांनी आसिफ खान यांच्या हत्येची कबुली दिली असली तरी, त्यांचा मृतदेह न गवसल्याने काल रात्रीपर्यंत आरोपींची नाव सांगण्यास पोलीस असमर्थ ठरले.

मंगळवारी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा उलगडा केला. 6 जणांनी मिळून आसिफ खानचा खून केला असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात आरोपी असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ज्योती गणेशपुरेसह आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आसिफ खानचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याने पूर्णा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना मृतदेह आढळल्यास पोलिसांना माहीत द्यावी असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.

आसिफ खान यांना गुरुवारी १६ ऑगस्टला ज्योती गणेशपुरे यांचा फोन आला होता. तिने आसिफ खान यांना मूर्तिजापूर येथे तिच्या बहिणीकडे भेटायला बोलावले होते. तेव्हापासून आसिफ खान बेपत्ता होते, अशी तक्रार आसिफ खान यांचा मुलगा डॉ. सोहेल खान यांनी बाळापुर पोलिसात दिली होती. आसिफ खान यांचा शोध सुरू केला असता, त्यांची कार म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या काठावर चालू अवस्थेत दिसून आली. पोलिसांना या कारमधून संशयास्पद पुरावे हाती लागले होते. काही लोकांची कसून चौकशी केली असता आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस काल रात्री उशिरा ताब्यात घेतलेल्या आरोपींना घेऊन घटनास्थळावर गेले होते. त्यावेळेस आरोपिंनी ज्या ठिकाणी आसिफ खानचा मृतदेह नदीत फेकला ती जागा पोलिसांना दाखवली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी आसिफ खान यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह आणला आणि म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पुराच्या मध्यभागी फेकून दिला होता. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 09:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close