राहुल गांधींपूर्वी अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर; महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष ठरला

Rahul Gandhi यांचा राजीनामा मंजूर होण्यापूर्वी Ashok Chavan यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 05:18 PM IST

राहुल गांधींपूर्वी अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर; महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष ठरला

दिल्ली, प्रशांत लीला रामदास, 02 जुलै: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या असून अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसनं मान्य केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर, प्रदेशाध्यक्षपदी आता बाळासाहेब थोरात यांची निवड होणार असल्याची माहिती सुत्रांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत होतं. पण, बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती मिळाली असून लवकरच याबाबची घोषणा होणार आहे. दरम्यान दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत असून राहुल गांधी देखील आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

राहुल गांधींचा राजीनामा या कारणास्तव स्वीकारला जात नाही!

काँग्रेसचा दारूण पराभव

राज्यात देखील काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा देखील पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

विधानसभेसाठी तयारी

Loading...

लोकसभेचा पराभव झटकून काँग्रेसनं आता विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. तर, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आता सुशिलकुमार शिंदे यांचं नाव देखील चर्चेत असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुशिलकुमार शिंदे हे गांधी कुटुंबियांच्या विश्वासातील देखील आहे. त्यामुळे आता सुशिलकुमार शिंदे यांच्या नावावर लवकर घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.

VIDEO: संजय राऊत का होतायत ट्रोल? इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...