नांदेडमधील विजय ही तर परिवर्तनाची नांदी - अशोक चव्हाण

नांदेडमध्ये भाजपने विकासाच्या मुद्यांवर लढण्याऐवजी फक्त फोडाफोडीचं राजकारण केल्यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारलं आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2017 07:59 PM IST

नांदेडमधील विजय ही तर परिवर्तनाची नांदी - अशोक चव्हाण

मुंबई, 12 ऑक्टोबर : नांदेडमध्ये भाजपने विकासाच्या मुद्यांवर लढण्याऐवजी फक्त फोडाफोडीचं राजकारण केल्यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारलं आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. नांदेडच्या निवडणुकीत भाजपने मला अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेचा आमदार फोडून त्याच्या हाती निवडणुकीचा कारभार देऊन आपल्याच कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केलं, त्यामुळेच नांदेडमध्ये भाजपची विश्वासहर्ता संपली आणि नांदेडकरांनी काँग्रेसला गेल्यावेळीपेक्षा जास्त जागा देऊन सत्ता बहाल केली. नांदेडकरांनी काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो, असंही अशोक चव्हाणांनी म्हटलंय.

''२०१९ च्या निवडणुकीबाबत बोलायच झालं तर मराठवाड्यातल्या आत्महत्या, जीएसटीबाबत लोकांमध्ये प्रक्षोभ आहे त्याचबरोबर पेट्रोलच्या वाढत्या किंमती हे सगळे विषय आता समोर येऊ लागले आहेत. नांदेडकरांनी काँग्रेसच्या बाजुने दिलेला कौल ही तर राजकीय परिवर्तनाची सुरूवात आहे, असंही चव्हाणांनी म्हटलंय.

2014च्या निवडणुकीत भाजप सोशल मीडियाचा गैरवापर करून सत्तेवर आलं होतं. पण तोच सोशल मीडिया त्यांच्यावर बुमरँग झाल्याने भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आम्ही सोशल मिडीयाचा वापर केला भाजप त्याचा गैरवापर करतं हा काँग्रेस आणि भाजपातला फरक आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. नारायण राणेंनी अभिनंदन केल्याबद्दल त्यांचेही अशोक चव्हाणांनी आभार मानलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...