नोटबंदी ही तर मोदी सरकारची 'मनी लॉन्ड्रिंग' स्कीम !- अरूण शौरी

सध्याचं सरकार हे अडीच माणसं चालवत असून त्यांनी देशाची वाट लावली असल्याचं शौरींनी म्हटलंय. नोटबंदी म्हणजे एकप्रकारे केंद्र सरकारची ही मनी लॉड्रिंगची स्किमच होती काय, अशी शंका घ्यायलाही बराच वाव आहे, असंही अरूण शौरी यांनी म्हटलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2017 02:42 PM IST

नोटबंदी ही तर मोदी सरकारची 'मनी लॉन्ड्रिंग' स्कीम !- अरूण शौरी

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : यशवंत सिन्हा यांच्यानंतर आता अरुण शौरी यांनी देखील ढासळल्या आर्थिक स्थितीवरून मोदी सरकारला लक्ष केलंय. सध्याचं सरकार हे अडीच माणसं चालवत असून त्यांनी देशाची वाट लावली असल्याचं शौरींनी म्हटलंय. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे परखड मत व्यक केलंय. देश चालवणाऱ्या या अडीच माणसांची व्याखा करताना शौरी यांनी अरूण जेटलींना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या घरचे वकील म्हणूनही हिनवलंय.

नोटबंदीच्या निर्णयावरही शौरींनी सडकून टीका केलीय. नोटबंदीच्या निर्णयाला कोणी धाडसी म्हणत असेल आत्महत्या करायलाही धाडसच लागतं. आणि पंतप्रधानांच्या या धाडसामुळेच देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलीय. नाही म्हणायला या नोटबंदीच्या काळात श्रीमंतांनी त्यांच्याकडचा सर्व काळा पैसा पांढरा करून घेतलाय. त्यामुळे नोटबंदी म्हणजे एकप्रकारे केंद्र सरकारची ही मनी लॉड्रिंगची स्किमच होती काय, अशी शंका घ्यायलाही बराच वाव आहे, असंही अरूण शौरी यांनी म्हटलंय. शौरी हे वाजपेयी सरकारच्या काळात निर्तुंवणूक मंत्री होते. तसंच ते टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस सारख्या दैनिकांचे संपादकही राहिलेले आहेत. याशिवाय आरबीआयमध्ये त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणूनही काम पाहिलेलं आहे. नियोजन आयोगाचेही ते सल्लागार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या टीकेला नक्कीच महत्व प्राप्त होतं.

देशाचा जीडीपी हा तांत्रिक कारणांमुळे घसरल्याचा दावा मध्यतंरी अमित शहा यांनी केला होता. त्यावर अरुण शौरी यांना विचारलं असता त्यांनी 'ओ...दॅट फेमस इकॉनॉमिस्ट' अशा शेलक्या शद्बात त्यांचा समाचार घेतला. मोदी, आणि अमित शहाला अर्थशास्त्रातलं काहीच कळत नाही आणि त्यांच्या आजुबाजुलाही कोणीच अर्थतज्ज्ञ नाहीत त्यामुळेच देशाची आर्थिक स्थिती ढासळली असून बेरोजगारीसारख्या समस्या निर्माण झाल्यात. असंही शौरी यांनी म्हटलंय. देशाच्या बिकट अर्थव्यवस्थेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेच जबाबदार असल्याचंही शौरी म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2017 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...