S M L

ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचं निधन

आज दुपारी दोन वाजता सायनच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: May 6, 2018 11:12 AM IST

ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचं निधन

06 मे: ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचं आज सकाळी सहा वाजता निधन झालं आहे. आपल्या राहत्या घरातच त्यांनी अंतिम श्वास घेतला  आहे.  आज दुपारी दोन वाजता सायनच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आपल्या गायनाचा आणि संगीताचा ठसा त्यांनी मराठी सिनेसृष्टीत उमटवला होता. गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावली होती. 4 मेलाच  आजारी होते. भातुकलीच्या खेळामधले,शुक्रतारा अशा विविध गाण्यांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आयुष्यातील प्रत्येक  मैफल त्यांनी शुक्रतारा या गाण्याने  त्यांनी गाजवली.   1960च्या दशकात  मुंबई रेडिओवरून त्यांची गायन करिअरची सुरूवात झाली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिेलं नाही. त्यांना गजानन वाटवे पुरस्कारही मिळाला होता.

त्यांच्या मृत्युमुळे खूप मोठी पोकळी संगीत क्षेत्रात निर्माण झाली आहे.

अरूण दाते -थोडक्यात माहिती

-   जन्म - 4 मे 1934

Loading...

- जन्म ठिकाण - इंदूर

- वडील रामूभैय्या दाते प्रसिद्ध गायक होते

- कुमार गंधर्वांकडे गाणं शिकले

- टेक्सटाईल इंजीनिअरिंगचं शिक्षणही पूर्ण केलं

- काही वर्षं नोकरी केल्यावर पूर्णवेळ गायनाला सुरुवात

- भावगीतांवर विशेष भर

- 1962 - 'शुक्रतारा मंदवारा' हे पहिलं गाणं

- 'शुक्रतारा मंदवारा' तुफान गाजलं

- यशवंत देव आणि मंगेश पाडगावकरांसोबत अनेक गाणी

- आनंद गाणी, शुक्रतारा खंड पहिला आणि अलौकिक गाणी हे अल्बम गाजले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2018 08:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close