वांग मराठवाडी धरणावर धरणग्रस्तांचं आंदोलन

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2013 09:13 PM IST

वांग मराठवाडी धरणावर धरणग्रस्तांचं आंदोलन

satara dharan10 ऑगस्ट : प्रलंबित मागण्यांसाठी धरणग्रस्त धरणांमध्ये उतरुन आंदोलन करत आहे. सातारा जिल्ह्यातल्या वांग मराठवाडी धरणावर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात चले जाव आंदोलन करण्यात आलं. 'आधी पुनर्वसन मगच धरण' असं जरी सरकारचं धोरण असलं तरी राज्यभरातल्या धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. काहींना जमिनी मिळाल्या नाहीत तर काहींना पैसेही मिळाले नाहीत. अशा अनेक समस्यांमधून सध्या हे धरणग्रस्त जातायत, पण सरकारशी वारंवार चर्चा करुनही प्रश्न मात्र जैसे थेच आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2013 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...